शहर

प्रताप क्रीडा मंडळाच्या वतीने शालेय मुला मुलीसाठी नृत्य, अभिनयाच्या एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन

महर्षि डिजीटल न्यूज

अकलूज : कला, क्रीडा, सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या येथील प्रताप क्रीडा मंडळाच्या वतीने शालेय मुला मुलीसाठी तज्ञ नृत्य दिग्दर्शकांच्या मार्गदर्शनाखाली  नृत्य, अभिनय, पदमन्यास यांची एक दिवसीय कार्यशाळा आयोजित केली असल्याची माहिती मंडळाच्या अध्यक्षा कु. स्वरूपाराणी मोहिते पाटील यांनी दिली.

    मा.कु.स्वरुपाराणी मोहिते पाटील पुढे म्हणाल्या, श्रीमती रत्नप्रभादेवी शंकरराव मोहिते पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त व प्रताप क्रीडा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जयसिंह शंकरराव मोहिते पाटील आणि अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह शंकरराव मोहिते पाटील यांच्या अमृत महोत्सवी वाटचालीच्या निमित्ताने दिनांक २३,२४ व २५  डिसेंबर २०२३ रोजी राज्यस्तरीय समूह नृत्य स्पर्धेचे आयोजन केलेले आहे. विद्यार्थ्यांच्या अंगी असणाऱ्या कलागुणांना संधी मिळावी, त्यांना प्रोत्साहन मिळावे या हेतूने प्रताप क्रीडा मंडळ समूह नृत्य स्पर्धेचे आयोजन करते.

या मध्ये सहभागी कलावंतांना नृत्य, अभिनय,पदन्यासाचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण मिळावे याकरिता पालक,विद्यार्थी ,कलाकार, शाखाप्रमूख व शिक्षकांच्या खास आग्रहास्तव रविवार दि.२६ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी १० ते २ या वेळेत महाराष्ट्र राज्यातील तज्ञ बाह्य कोरिओग्राफर व प्रशिक्षकांच्या समवेत  समूहनृत्य सहभागी कलाकारां साठी “नृत्य, अभिनय, पदन्यास” प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित केलेली असल्याचेही स्वरूपाराणी मोहिते पाटील यांनी सांगितले.

या मध्ये सर्व सहभागी इंग्रजी,मराठी,सेमीइंग्रजी, प्राथमिक, माध्यमिक, उच्चमाध्यमिक महाविद्यालय यांचे संस्था, खाजगी, जिप, इतर सर्व शाळांनी यामध्ये सहभाग घ्यावा. शाखाप्रमुखांनी मोठ्या प्रमाणात विद्यार्थी कलावंतांना प्रोत्साहन द्यावे व यामध्ये सहभागी करून घेण्याचे आवाहन मंडळाचे उपाध्यक्ष पोपटराव भोसले पाटील यांनी केले आहे. 

  या प्रशिक्षणासाठी पूर्व भागातील सर्व शाळासाठी- स्मृतिभवन शंकरनगर केंद्र असून या केंद्रासाठी -प्रमुख मुख्याध्यापक संजय गळीतकर, अमोल फूले, प्रताप तोरणे, संजय मुंगसे, उदय उरणे, मल्हारी घुले, दिलीप मोहिते, एन.डी.काळे हे असतील

तर पश्चिम भागातील सर्व शाळासाठी शिवामृत सांस्कृतिक भवन, सदाशिवनगर केंद्र असून पश्चिम भाग केद्रासाठी-पोपट देठे,विकास सूर्यवंशी, पी.व्ही.नवगिरे, श्रीकांत दाते,अशोक रणवरे, शिवाजी कर्चे,आर.आर.कर्चे काम पाहणार  असल्याचे डॉ.विश्वनाथ आवड यांनी सांगितले. या करीता सकाळी-८-३० ते ९-३० नावनोंदणी,

 ९-३० ते १० उदघाटन, १०ते १२ पहिले सञ, दुपारी-१२ ते १२-४५ भोजन/अल्पोपहार, १२-४५ ते २ दुसरे सञ अशी वेळ असल्याचे मंडळाचे सचिव बिभिशन जाधव यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!