Latest News

दंगा काबू पथकासह अकलूजमध्ये पोलिसांचा रूट मार्च ; ६ अधिकारी २५ अंमलदार यांच्यासह तामिळनाडूचे जवान सहभाग

महर्षि डिजीटल न्यूज / सागर खरात

अकलूज : येत्या सण-उत्सवांचा कालावधी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संभाव्य निवडणुका आणि साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे जयंती या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने अकलूज पोलीस ठाणे हद्दीत दिनांक २ ऑगस्ट २०२५ रोजी रूट मार्चचे आयोजन करण्यात आले. यामध्ये दंगा काबू पथकास सहा अधिकारी 25 आमदार व तामिळनाडूचे जवानांनी सहभाग नोंदवला.

सदर रूट मार्च सायं. ४.३० ते ६.२५ या वेळेत अकलूज व माळीनगर सवतगव्हणं परिसरात पार पडला. यामध्ये अकलूज पोलीस ठाणे आणि माळीनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार (एकूण ६ अधिकारी व २५ अंमलदार), RAF Platoon (९९ वाहिनी सिकंदराबाद, तामिळनाडू) मधील श्रीमती सरस्वती के. ए. (डेप्युटी कमांडन्ट) यांच्या नेतृत्वाखालील ३ अधिकारी व ३३ जवान तसेच RCB चे १६ अंमलदार सहभागी झाले होते.

रूट मार्च अकलूज येथील ST स्टँडपासून सुरू होऊन जिजामाता प्रशाला, सदूभाऊ चौक, महावीर स्तंभ, गांधी चौक, विजय चौक, जुने पोलीस ठाणे, उपजिल्हा रुग्णालय, भाजी मंडई, आझाद चौक या मार्गांवरून काढण्यात आला. त्यानंतर माळीनगर सवतगव्हणं परिसरातही शांतता व सुरक्षिततेचा संदेश देणारा रूट मार्च पार पडला.

रूट मार्चच्या माध्यमातून पोलीस प्रशासनाने नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करत, कायदा-सुव्यवस्थेचा ठाम इशारा दिला आहे. आगामी काळातील सण, निवडणुका व सामाजिक कार्यक्रम सुरळीत पार पडावेत यासाठी प्रशासन सज्ज असल्याचा विश्वास या रूट मार्चने दिला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!