८.७५ लाखांचा डल्ला टाकणारा अट्टल चोर मध्यप्रदेशात पकडला; अकलूज पोलिसांची थरारक कारवाई

महर्षि डिजीटल न्यूज / सागर खरात
अकलूज : महिला बचत गटाच्या पदाधिकाऱ्यांची बॅग लंपास करून तब्बल ८ लाख ७५ हजारांचा डल्ला टाकणारा अट्टल आंतरराज्यीय चोर अखेर पोलिसांच्या जाळ्यात सापडला. मध्यप्रदेश राज्यातून थेट धडक देत अकलूज पोलिसांनी संपूर्ण रक्कम जप्त करत बचत गटातील महिलांना दिलासा दिला आहे. या थरारक कारवाईने परिसरात चर्चेला उधाण आले आहे.
बचत गटातील महिलांना वाटप करण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी बँकेतून काढलेली रक्कम चोरट्याने पाळत ठेवून लंपास केली होती. सर्वसामान्य कुटुंबातील महिलांसाठी ही मोठी आर्थिक हानी होती. परंतु तात्काळ तपास हाती घेत पोलिसांनी तांत्रिक साधनांचा वापर करून आरोपीचा माग काढला आणि मध्यप्रदेशात सापळा रचून त्याला जेरबंद केले.
या धडाकेबाज कामगिरीत अकलूज पोलीस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल शिवकुमार मदभावी, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील तपास पथक – एएसआय निकम, पोलीस नाईक खरात व पोलीस नाईक लोहार यांनी विशेष भूमिका बजावली.
याबाबतचा सविस्तर तपशील संबंधित लवकरच महर्षि डिजीटल न्यूज मधून आम्ही प्रकाशित करणार आहोत.



