शहर

अकलूज परिसरातील दिव्यांगांसाठी सुवर्णसंधी ; अकलूज नगरपरिषद करणार सोय

महर्षि डिजीटल न्यूज

अकलूज : अकलूज नगरपरिषद अंतर्गत दिव्यांग बांधवांसाठी अकलूज नगरपरिषदेने सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली असून दिव्यांगांच्या कार्यक्रमासाठी सोलापूरला जाण्याची सोय करण्यात आले असल्याची माहिती मुख्याधिकारी दयानंद गोरे यांनी दिली.

याबाबत अधिक माहिती देताना मुख्याधिकारी गोरे म्हणाले, अकलूज नगरपरिषद अकलूज तर्फे सर्व नागरिकांना जाहिर आवाहन करण्यात येते की, महाराष्ट्र शासन दिव्यांग कल्याण विभाग आयोजित दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी अभियान अंतर्गत विविध योजनांची माहिती व लाभ वाटप जिल्हास्तरीय कार्यक्रम  बुधवार  दिनांक 20 सप्टेंबर 2023 रोजी कर्मयोगी आप्पासाहेब काडादी सांस्कृतिक सभागृह, श्री.सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना कुमठे, होडगी रोड,सोलापूर येथे आयोजित केले आहे.

तरी अकलूज नगरपरिषद हद्दीतील सर्व दिव्यांग बांधवांनी सदर कार्यक्रमास जाण्यासाठी अकलूज नगरपरिषदेशी संपर्क साधावा.असे आवाहन अकलूज नगरपरिषद अकलूज तर्फे करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!