महाराष्ट्र

खंडाळी नजीक भीषण अपघात ; दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू 

महर्षि डिजीटल न्यूज

वेळापूर : माळशिरस तालुक्यातील अकलूज सांगोला या महामार्गावरती खंडाळी गावानजीक शिंदे वस्ती या ठिकाणी झालेल्या अपघातामध्ये माळशिरस तालुक्यातीलच अकलूज येथील रहिवासी,राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक व श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचा धारकरी रोहित सूर्यवंशी याचा जागीच मृत्यू झाला आहे तर त्यांच्या दुचाकी वरती पाठीमागे बसलेली त्यांची आई या अपघातामध्ये जखमी झाली आहे.

याबाबत प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार पिकअप क्रं. एम एच  45 एएफ 7803 ने रोहित सूर्यवंशी यांची दुचाकी क्रं. एम एच 13 बीई 4175 ला जोराची धडक दिली. यामध्ये सूर्यवंशी यांच्या डोक्याला मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांची आई या अपघातामध्ये जखमी झाली आहे.  

रात्री उशिरा अकलूज येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये रोहित सूर्यवंशी यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यानंतर अकलूज येथील सार्वजनिक स्मशानभूमी मध्ये त्यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान अपघातानंतर वेळापूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे याप्रकरणी वेळापूर पोलीस अधिकचा तपास करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!