शिवतेजसिंह मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ७५ महिलांना अष्टविनायक दर्शन यात्रा
महर्षि डिजीटल न्यूज
अकलूज : अकलूज ग्रामपंचायतचे माजी सरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अकलूज परिसरातील तब्बल ७५ महिलांना अष्टविनायक गणपतीचे दर्शन यात्रेचा शुभारंभ शिवतेजसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते आज करण्यात आला.
डिजिटल बॅनर, हार, फेटे अशा अनावश्यक खर्चाला फाटा देत येथील शिवकीर्ती युवा मंचाचे उपाध्यक्ष अनिल उघडे, राहुल बोबडे, प्रकाश गायकवाड, प्रीतम एकतपुरे यांनी परिसरातील ७५ महिलांना अष्टविनायक गणपतीचे दर्शन घडवून आणण्याचे आयोजन केले आहे. दोन दिवसाच्या दर्शन यात्रेमध्ये महिला भक्तांना चहा, पाणी, नाश्ता, जेवण व निवासाची ही उत्तम सोय करण्यात आली आहे.
यात्रेच्या नियोजनासाठी ज्येष्ठ पत्रकार सूर्यकांत भिसे, गणेश वसेकर, चंदन कोतमिरे, राजू माने, संदीप माने, लिंगराज गोसावी, योगेश जामदार, राहुल जाधव, सूर्यकांत ननवरे यांनी विशेष सहकार्य केले.