Latest News

‘महर्षि’ च्या बातमीचा ‘झटका’ ; महावितरणकडून तात्काळ दखल, पाच दिवसांपासून अंधारात असलेली माळेवाडी पुन्हा प्रकाशमय

महर्षि डिजीटल न्यूज
अकलूज : ‘महर्षि’ मध्ये प्रसिध्द झालेली बातमी म्हणजे 100 टक्के दखल घ्यायला लावणारी बातमी हे समिकरण पुन्हा एकदा सिध्द झाले आहे. वाचकांची विश्‍वासार्हता व अधिकारी व लोकप्रतिनिधींकडून घेतली जाणारी दखल यामुळेच ‘महर्षि’ च्या सर्वच माध्यमांवर वाचकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे.

गेल्या आठवड्यात साप्ताहिक महर्षि मध्ये महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी अर्थात महावितरणच्या यशवंतनगर कार्यालयाअंतर्गत चालणार्‍या विज चोरी व अधिकार्‍यांच्या मनमानी कारभाराबाबत प्रसिध्द केलेल्या वृत्ताची दखल घेत संबंधित अधिकार्‍याची उचलबांगडी करण्यात आली असून त्यांना बडतर्फ करण्याच्याही हालचाली सुरू असल्याची खात्रिशीर माहिती आहे.

याबरोबरच काल महर्षि डिजीटल न्यूज या आमच्या वेबपोर्टलवर प्रसिध्द करण्यात आलेल्या ‘डिपी जळाल्याने माळेवाडी येथील नागरीक पाच दिवसांपासून अंधारात ; त्रस्त नागरीक महावितरणच्या कार्यालयासमोर आंदोलना करण्याच्या तयारीत‘ या बातमीची तात्काळ दखल माळेवाडी(संजयनगर) परिसरातील डिपी सुरू करण्यात आला आहे.

सर्वसामान्य नागरीकांनी मांडलेल्या समस्या व त्याचे ‘महर्षि’ च्या माध्यमांतून झालेले वृत्तांकन याची संबंधित विभागातील वरीष्ठ अधिकार्‍यांमार्फत दखल घेतल्यामुळे ‘महर्षि’ च्या विश्‍वासार्हतेवर शिक्कामोर्तब झाला असून समस्याग्रस्त नागरिकांकडून समाधान व्यक्‍त करण्याबरोबरच ‘महर्षि डिजीटल न्यूज’ व साप्ताहिक महर्षिचे अभिनंदन करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!