4 जुलैला ग्रामदैवत श्री अकलाईदेवीचा भंडारा ; विविध मंडळांकडून मंदिराची साफसफाई व स्वच्छता
महर्षि डिजीटल न्यूज
अकलूज : अकलूज गावचे ग्रामदैवत श्री अकलाई देवीचा भंडारा ( यात्रा ) मंगळवार दिनांक 4 जुलै 2023 रोजी आयोजित करण्यात आली असून भंडारा यात्रा निमित्त गेले 38 वर्षापासून अकलूज ग्रामपंचायत चे माजी सरपंच किशोरसिंह मारुतराव माने – पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अकलूज गावचे ग्रामदैवत श्री अकलाई देवी मंदिर व मंदिर परिसर स्वच्छता व साफसफाई करण्याकरिता सालाबाद प्रमाणे ही वर्षी शनिवार दिनांक 1 जुलै 2023 रोजी सकाळी 10 वाजता मंदिर व परिसर साफसफाई करण्यात आली.
स्वच्छता व साफसफाई साठी लोकमान्य गणेश मंडळ गांधी चौक अकलूज, साई सेवा ट्रस्ट संग्राम नगर अकलूज, शिवरत्न गणेश मंडळ विजय चौक अकलूज, स्वामी विवेकानंद मंडळ व शिवगर्जना ग्रुप अकलूज, अकलूज शहर बुरुड समाज व युवा मंच, अकलूज शहर वडर समाज, श्री स्वामी समर्थ भक्त मंडळ क्रांतिसिंह नगर अकलूज, श्री स्वामी समर्थ ग्रुप अकलूज व अकलूज नगर परिषद या सर्वांनी सामाजिक स्वच्छता उपक्रमामध्ये सहभाग घेतला.
श्री अकलाई देवी देवस्थान व गुरव याच्या वतीने या सर्व मंडळांचा श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला



