शिखर शिंगणापूर येथे श्रावणी सोमवारनिमित्त महादेवाला दुग्धाभिषेक व भाविकांना खिचडी वाटप

महर्षि डिजीटल न्यूज | सागर खरात
अकलूज : शिखर शिंगणापूर येथे आज दिनांक 7 सप्टेंबर 2026 रोजी श्रावणी सोमवार निमित्त आराध्य दैवत श्री शंभू महादेवाला दुग्धाभिषेक व पूजा माजी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, जिल्हा परिषद सदस्य अर्जुनसिंह मोहिते पाटील, विश्वतेजसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आली.
तसेच महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली श्री शंकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन व माजी आमदार रणजितसिंह विजयसिंह मोहिते पाटील, व्हाईस चेअरमन, संचालक व कामगार यांच्या संयुक्त विद्यमाने आज श्रावणी सोमरानिमित्त शिखर शिंगणापूर येथे आलेल्या भाविकांना उपवासाच्या खिचडीचे वाटप करण्यात आले.
यावेळी श्री शंकर साखर कारखान्याचे संचालक सुनिल माने, दादा पाटील, सुधाकर पोळ, माऊली सुळ, कार्यकारी संचालक स्वरूप देशमुख साहेब, राहुल बडवे, कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी व भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.



