ई.आर. न्यूज मराठी चॅनेलच्या वतीने खंडाळीतील अंगणवाडी व जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

महर्षि डिजीटल न्यूज | सागर खरात
अकलूज : आरक्षणाचे जनक, लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या १५२ व्या जयंतीनिमित्त ई. आर. न्यूज मराठी चॅनेलच्या वतीने तसेच पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते सौरभ वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली खंडाळी येथील अंगणवाडी व जिल्हा परिषद शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी आयोजक पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते सौरभ वाघमारे यांनी सांगितले की, “माझेही प्राथमिक शिक्षण खंडाळी येथील अंगणवाडी व जिल्हा परिषद शाळेत झाले आहे. याच शाळेने मला घडवले, संस्कार दिले आणि समाजासाठी कार्य करण्याची प्रेरणा दिली. त्यामुळे या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम राबविणे ही माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची व भावनिक बाब आहे. राजर्षी शाहू महाराजांच्या शिक्षणप्रेमी व समाजहिताच्या विचारांना अभिवादन म्हणून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीस हातभार लावण्याच्या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला.”
या कार्यक्रमास माळशिरस तालुक्यातील आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते विकास धाईंजे, माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब धाईंजे, सेंट्रल ह्यूमन राईट संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष कुमार लोंढे, खंडाळी गावचे माजी सरपंच बाबुराव पताळे, युवा नेते अमोल मेथा, उपसरपंच रिकेश चव्हाण, बुलंद पोलीस टाइमचे सहसंपादक राहुल मस्के, ई. आर. न्यूज मराठीचे सहसंपादक विनोद लोखंडे, क्रांतिवीर न्यूजचे मुख्य संपादक तुषार केंगार, बहुजन सत्यशोधक संघाचे महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष हेमंत कांबळे, युवा नेते सुनील खांडेकर, बहुजन सत्यशोधक संघाचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब लोंढे, भीमशक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष अंकुश धाईंजे, बहुजन सत्यशोधक संघाचे युवा जिल्हाध्यक्ष अवि गायकवाड, बहुजन सत्यशोधक संघाचे तालुका सचिव रवींद्र काकडे
बौद्धाचार्य दिलीप वाघमारे, धम्म उपासक दत्ताभाऊ वाघमारे, सामाजिक कार्यकर्ते अशोक शिंदे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आनंद वाघमारे, सामाजिक कार्यकर्ते अभय वाघमारे, सामाजिक कार्यकर्ते सार्थक वानकर यांच्यासह मुख्याध्यापक मनोहर एकतपुरे, शाळेतील सर्व शिक्षक-शिक्षिका, विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या शिक्षण, समता व सामाजिक न्यायाच्या विचारांचा जागर करून प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत शिक्षणाच्या संधी पोहोचविणे ही काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि उत्साह हा कार्यक्रमाचा मुख्य आकर्षण ठरला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व मान्यवरांचे, शिक्षकवृंदाचे, मित्रपरिवाराचे, ग्रामस्थांचे व उपस्थित नागरिकांचे आयोजक पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते सौरभ वाघमारे यांनी मनःपूर्वक आभार मानले.



