Latest News

संतापजनक! घरात घुसून मूकबधिर महिलेला झोडपले ; चिमुरडीवर नराधमाचा अत्याचार करण्याचा प्रयत्न, अकलूज पोलिसात गुन्हा दाखल

महर्षि डिजीटल न्यूज | सागर खरात 

अकलूज : माळशिरस तालुक्यातील बागेचीवाडी (वाघमारेवस्ती) येथे एका संतापजनक घटनेत मूकबधिर महिलेला मारहाण करून घराबाहेर काढत, तिच्या घरात झोपलेल्या एका चिमुरडीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी अकलूज पोलीस ठाण्यात आरोपी संतोष गोकुळ भोसले (रा. विजयचौक, अकलूज) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलीची आई मागील काही महिन्यांपासून खळवे येथे शेतमजूर म्हणून काम करते. तर तिची मुलगी शाळेला सुट्या असल्याने बागेचीवाडी येथील तिच्या मामाच्या घरी (अमर राजेंद्र कदम) राहण्यास गेली होती.

सोमवार, दिनांक ६ जुलै २०२६ रोजी दुपारी २:३० वाजण्याच्या सुमारास, पीडित मुलगी, तिची मूकबधिर मामी आणि मामाची मुले घरात झोपलेली होती. यावेळी आरोपी संतोष भोसले याने घरात बेकायदेशीर प्रवेश केला. त्याने पीडित मुलीच्या मूकबधिर मामीला हाताने व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्यानंतर मामी आणि तिच्या लहान मुलांना जबरदस्तीने घराबाहेर ओढून काढले आणि घराचा दरवाजा आतून बंद करून घेतला.

दरवाजा बंद केल्यानंतर आरोपी संतोष याने मुलीला खाली पाडले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. यावेळी घाबरलेल्या चिमुरडीने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली आणि आरोपीला दूर लोटून कसाबसा दरवाजा उघडला व घराच्या पाठीमागे पळ काढला. या धाडसामुळे मोठा अनर्थ टळला. आरोपी तेथून पळून गेल्यानंतर मुलगी घरात परतली.

सुरुवातीला मामाच्या भीतीपोटी चिमुरडीने किंवा कुटुंबाने कोणाला काही सांगितले नाही. मात्र, बुधवार, दिनांक ८ जुलै रोजी पीडित मुलीच्या आजीने घरी आल्यानंतर विचारपूस केली असता, मुलीने घडलेला सर्व धक्कादायक प्रकार आजीला सांगितला. आजीने तात्काळ मुलीच्या आईला फोन करून बोलावून घेतले.

मुलीच्या आईने तत्परतेने खळवे येथे पतीशी आणि नातेवाईकांशी चर्चा करून थेट अकलूज पोलीस ठाणे गाठले. गुरुवारी, ९ जुलै २०२६ रोजी पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून अकलूज पोलिसांनी आरोपी संतोष गोकुळ भोसले याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!