Latest News

“अकलूज बाजार समितीचा मोठा निर्णय; आठवड्यातून दोनदा जनावरांचा बाजार – शेतकरी व व्यापाऱ्यांसाठी नवी संधी!”

महर्षि डिजीटल न्यूज | सागर खरात 

अकलूज : अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकरी व व्यापारी वर्गासाठी महत्त्वपूर्ण असा निर्णय घेण्यात आला असून आता दर सोमवारी व शुक्रवारी जनावरांचा तसेच शेळ्या-मेंढ्यांचा आठवडा बाजार नियमित भरणार आहे. या निर्णयामुळे परिसरातील शेतकरी व व्यापाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

शेतकरी व जनावर व्यापाऱ्यांच्या वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर तसेच महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री  विजयसिंह मोहिते पाटील यांच्या सूचनेनुसार बाजार समितीत विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते पाटील, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, माढा लोकसभेचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासह संचालक मंडळ, शेतकरी व व्यापारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठकीदरम्यान सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला. आठवड्यातून दोन वेळा बाजार भरविण्यामुळे जनावरांच्या खरेदी-विक्रीस चालना मिळणार असून शेतकऱ्यांना योग्य दर मिळण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. तसेच व्यापाऱ्यांसाठीही हा निर्णय फायदेशीर ठरणार असल्याचे मत उपस्थितांनी मांडले.

बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते पाटील यांनी सांगितले की, “आठवड्यातून दोन वेळा बाजार भरल्यामुळे अकलूजसह संपूर्ण माळशिरस तालुक्यातील अर्थचक्राला गती मिळणार असून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल.”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!