“राम सातपुते, आता तरी शहाणे व्हा!” – आदिनाथच्या निकालाने दिली सणसणीत चपराक ; अहंकाराला येथे थारा नाही

महर्षि डिजीटल न्यूज
सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोहिते पाटील ब्रँडचे वर्चस्व अधोरेखित झाले आहे. करमाळा तालुक्यातील आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत आमदार नारायण आ पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि मोहिते पाटील f मार्गदर्शनाखालीबा लढवण्यात आलेल्या पॅनलने विरोधकांना 21-0 ने साफ झोडपलं. ही निवडणूक केवळ एक संस्था निवडणूक नव्हती, तर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर सोलापूर जिल्ह्याच्या राजकीय नाडीचा स्पंदन तपासणारा कसोटी क्षण होता… आणि या क्षणी राम सातपुते पुन्हा एकदा धडाधडा आपटले.
राज्याच्या राजकारणात भाजप युती सत्तेवर आल्यानंतर, माजी आमदार राम सातपुते यांना एक वेगळाच ‘राजकीय उन्माद’ चढलेला दिसतो आहे. पराभवांचे मालक ठरलेले सातपुते यांना सोलापूर लोकसभा, माळशिरस विधानसभा हे अपयश पुरेसे वाटले नाही, म्हणून की काय, त्यांनी आदिनाथ कारखान्याच्या निवडणुकीत दखल देण्याचा प्रयत्न केला आणि त्यातच फडणवीस यांच्या नावाची टाकलेली भडिमार, तोही प्रचारात. पण मतदारांनी त्यांची ‘नाक घालण्याची’ सवय ओळखून त्यांना साफ झिडकारलं.
संजय शिंदे यांच्या पॅनलचा पराभव म्हणजे केवळ एक पॅनल हरलं नाही, तर सातपुते यांच्या अहंकाराचा पराभव झाला. निवडणूक प्रचारादरम्यान वारंवार घसरत गेलेली त्यांची जीभ, आणि राजकीय शिष्टाचाराच्या सर्व सीमांचा केलेला भंग, यावरून स्पष्ट होतं की सातपुते यांना अजूनही राजकारण म्हणजे ‘दादागिरी आणि फुकटची बडबड’ वाटते.
मात्र, मतदार सुज्ञ आहेत, त्यांनी “पावसात हाल्या न्याहला” म्हणणाऱ्या सातपुते यांना सणसणीत चपराक दिली आहे. मोहिते पाटील कुटुंब चार पिढ्यांपासून सोलापूरच्या राजकारणाची नाडी सांभाळत आहे. विकास, संयम आणि जनतेशी असलेला थेट संवाद – हे त्यांच्या कार्याचे ब्रीद आहे. त्यांच्याशी तुलना करताना सातपुते यांनी आरशात पाहायला हवे.
हा निकाल म्हणजे केवळ विजय नाही, तर एका दिशाभूल करणाऱ्या राजकीय प्रवृत्तीचा पराभव आहे. आता तरी राम सातपुते यांनी ‘शहाणपणाचा राजकारणात’ स्वीकार करावा, अन्यथा मतदारांनी वेळोवेळी दाखवून दिलंच आहे… अहंकाराला येथे थारा नाही.



