भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील यांच्याबाबत गौरवोद्गार ; कारवाईची मागणी करणाऱ्यांना जोरदार चपराक
महर्षि डिजीटल न्यूज/सागर खरात
अकलूज : भारतीय जनता पक्षाच्या सदस्यता मोहिमेत आ.रणजीतसिंह मोहिते पाटील यांनी 1,000 नागरिकांना पक्षाचे सदस्य करून पक्षविस्तारात मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या या कार्याचा गौरव करत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्याचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. या अभिनंदनाने मात्र आमदार रणजीतसिंह यांच्यावर कारवाईची मागणी करणाऱ्यांना जोरदार चपराक बसली आहे.
विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर माजी आमदार राम सातपुते यांच्याकडून सातत्याने आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील यांच्यावर पक्षविरोधी कारवाई केल्याचा आरोप करून कारवाई करण्याची मागणी होत होते. अशा परिस्थितीतही आमदार रणजीतसिंह यांनी पक्षाप्रती आपली निष्ठा ढळू दिली नाही व पक्ष वाढीसाठी सातत्याने योगदान दिले आहे. याचीच दखल घेत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आमदार रणजीतसिंह यांचे अभिनंदन केले आहे.
बावनकुळे यांनी दिलेल्या पत्रात नमूद केल्याप्रमाणे, भाजपाच्या अंत्योदय धोरणाचे पालन करत आणि जनमानसात पक्षाची विचारधारा पोहोचवण्याचे महत्त्वाचे कार्य मोहिते पाटील यांनी केले आहे. पक्षासाठी त्यांचे योगदान अत्यंत मोलाचे असून, त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय नेतृत्वात संघटनात्मक बळकटी निर्माण झाली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताचा जागतिक स्तरावर सन्मान वाढला आहे, तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली महाराष्ट्र आर्थिक आणि सामाजिक क्षेत्रात प्रगती करत आहे. अशा परिस्थितीत, राज्याच्या विकासासाठी मोहिते पाटील यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे ठरत असल्याचे बावनकुळे यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.
भाजपा सदस्यता मोहिमेत त्यांनी एक हजार हून अधिक कार्यकर्त्यांना पक्षाशी जोडले असून, शिवाय महाराष्ट्राच्या विकासासाठी अनेक योजनांमध्ये त्यांनी सक्रीय सहभाग घेतला आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याबद्दल प्रदेशाध्यक्षांनी त्यांचे पुनःश्च अभिनंदन केले आहे.