Latest News

सहकार महर्षि साखर कारखान्यामध्ये संचालिका स्वरुपाराणी मोहिते पाटील यांच्या हस्ते मील रोलर पूजन 

महर्षि डिजीटल न्यूज 

अकलूज : येथील सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखान्यामध्ये गळीत हंगाम २०२४-२०२५ करीता मील रोलरचे पूजन कारखान्याच्या संचालिका स्वरुपाराणी जयसिंह मोहिते-पाटील यांचे शुभहस्ते करण्यात आले.

कारखान्याचे मार्गदर्शक संचालक व महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांचे कुशल मार्गदर्शनाखाली व चेअरमन जयसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांचे नेतृत्वाखाली कारखाना प्रगतीपथावर वाटचाल करीत आहे.

गळीत हंगाम २०२४-२०२५ चालू करण्याचे दृष्टीने कारखाना व इतर उपपदार्थ प्रकल्पाकडील ओव्हर हॉलिंगची कामे प्रगतीपथावर असून शेती विभागामार्फत ऊस तोडणी वाहतूकीचे वाहन करार सुरू असून ते अंतीम टप्प्यात आले असलेची माहिती कार्यकारी संचालक राजेंद्र केरबा चौगुले यांनी दिली.

कारखान्याने गळीत हंगाम २०२४-२०२५ मध्ये १० लाख मे.टन. ऊस गाळप करणेचे उद्दीष्ट ठेवले आहे. त्यासाठी कारखाना कार्यक्षेत्रातील सर्व सभासद व बिगर सभासद यांनी आपला ऊस कारखान्यास गळीतास देऊन सहकार्य करावे असे आवाहन कारखान्याच्या संचालिका स्वरुपाराणी जयसिंह मोहिते-पाटील यांनी केले.

सदर कार्यक्रम प्रसंगी कारखान्याचे व्हाईस चेअरमन शंकरराव माने-देशमुख तसेच संचालक-लक्ष्मण शिंदे, सतीश शेंडगे, नानासाहेब मुंडफणे, विजयकुमार पवार, विराज निंबाळकर, महादेव क्षिरसागर, अमरदिप काळकुटे, गोविंद पवार, जयदिप एकतपुरे, रामचंद्र तवरे, संचालिका सुजाता शिंदे, तज्ञ संचालक रामचंद्रराव सावंत पाटील, कार्यलक्षी संचालक- रणजित रणनवरे व शिवसृष्टी किल्ला व शिवछत्रपती मल्टिमेडीया लेजर शो कमिटीचे संचालक पांडुरंग एकतपुरे, बाळासाहेब माने-देशमुख, दत्तात्रय चव्हाण, विनायक केचे, राजेंद्र भोसले, धनंजय सावंत, नामदेव चव्हाण व सौ. हर्षाली निंबाळकर तसेच सर्व खातेप्रमुख, कामगार व युनियन प्रतिनिधी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!