“भैय्यासाहेब आता माघार घेऊ नका” – युवकांच्या आग्रहाला धैर्यशील मोहिते पाटील यांचे सकारात्मक उत्तर ; सोशल मीडियाच्या माध्यमातून साधला संवाद

महर्षि डिजीटल न्यूज
अकलूज : “लोकसभा निवडणूक लढवणार का? आता माघार घेऊ नका” यासह अनेक प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी युवकांनी आज धैर्यशील मोहिते पाटील यांच्याशी सोशल मीडियाच्या माध्यमातून संवाद साधला. मोहिते पाटील यांनीही अतिशय संयमपणे सर्वांना उत्तरे दिली.
सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्या ४५ व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आज धैर्यशील मोहिते पाटील यांनी इंस्टाग्राम लाईव्ह करत युवकांशी संवाद साधला. अडीअडचणी जाणून घेण्याबरोबर त्यांच्या अनेक प्रश्नांना सकारात्मक उत्तरे देण्याचा धैर्यशील मोहिते पाटील यांनी प्रयत्न केला.
दरम्यान एका युवकांनी आपण लोकसभा निवडणूक लढवणार का? असा प्रश्न विचारल्यानंतर “मी माढा लोकसभा निवडणूक लढवण्याची पक्षाकडे मागणी केली आहे आणि मला खात्री आहे माझी काम करण्याची पद्धत व आतापर्यंतच्या माझ्या कामाची दखल घेऊन पक्ष मला शंभर टक्के तिकीट देईल असे धैर्यशील माहिती पाटील यांनी सांगितले.
“भैय्यासाहेब आता माघार घेऊ नका” या कमेंटला उत्तर देताना ” आज आमचे आजोबा सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील साहेब यांची पुण्यतिथी आहे त्यांनी आम्हाला जीवात जिवमान असे पर्यंत जनतेची सेवा करा असा विचार दिला आहे त्याचे तंतोतंत पालन करण्याचा मी प्रयत्न करेन. असे सांगत अप्रत्यक्षपणे माघार घेणार नसल्याचे सूतोवाच दिले.
याबरोबरच कुर्डूवाडी येथील रेल्वे वर्कशॉप, केळी व डाळिंब उत्पादकांचे प्रश्न, पाणी प्रश्न, सैनिक स्कूलचा प्रश्न, एमआयडीसीचा प्रश्न अशा विविध प्रश्नांना उत्तरे देताना त्यांचा योग्य पाठपुरावा सुरू असून आम्ही ठोस काम करतो इतरांसारखी केवळ पोकळ जाहिरातबाजी न करता ते काम केल्याशिवाय सांगत नाही. असेही धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले.
मी तुम्हा सगळ्यांसाठी २४ तास उपलब्ध आहे. आपल्या योग्य कामांसाठी कधीही माझा दरवाजा वाजवा मी आपल्यासाठी हजर असेन असा शब्द आज सहकार महर्षींच्या पुण्यतिथी निमित्त देतो असे सांगून त्यांच्या विचारांचा वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील विकासाचा विचार मना-मनात रुजवण्यासाठी आपला प्रयत्न असल्याचे धैर्यशील मोहिते पाटील यांनी सांगितले.