शहर
सुखदेव वाघमारे यांचे अल्पश: आजाराने निधन

महर्षि डिजीटल न्यूज
अकलूज : येथील सुखदेव रेवण वाघमारे यांचे वयाच्या ६८ व्या वर्षी अल्पश: आजाराने निधन झाले. ते सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे शाखा अधिकारी म्हणून सेवा निवृत्त होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक विवाहित मुलगा, सून नातवंडे असा परिवार आहे. शिवरत्न शिक्षण संस्थेचे जनसंपर्क अधिकारी समाधान वाघमारे यांचे ते वडील होते. त्यांच्या मनमिळाऊ स्वभावाने ते परिसरात परिचित होते. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.



