Latest News

शिवशंकर बझारकडून दिवाळीचा जल्लोष : पणती–रांगोळी स्टॉल, आकर्षक ‘बंपर ऑफर्स’ आणि सवलतींची मेजवानी!

महर्षि डिजीटल न्यूज 

अकलूज : ना नफा ना तोटा तत्वावर कार्यरत असलेल्या शिवशंकर मध्यवर्ती सहकारी ग्राहक संस्थेच्या ‘शिवशंकर बझार’ या लोकप्रिय उपक्रमात यंदाच्या दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांसाठी आकर्षक ऑफर्स आणि सणासुदीच्या खरेदीचा जल्लोष सुरू झाला आहे. दिवाळी निमित्ताने पणती व रांगोळीच्या स्वतंत्र स्टॉलची उभारणी करण्यात आली असून, याचा शुभारंभ विद्यमान संचालिका देवन्या शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते झाला.

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या आशिर्वादाने व उद्योगमहर्षी कै. उदयसिंह मोहिते-पाटील यांच्या दूरदृष्टीतून तब्बल 30 वर्षांपूर्वी सुरू झालेला ‘शिवशंकर बझार’ आज चेअरमन डॉ.स्वयंप्रभादेवी मोहिते-पाटील यांच्या नेतृत्वाखाली तसेच किर्तीध्वजसिंह मोहिते-पाटील आणि शिवतेजसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे कार्यरत आहे.

सालाबादप्रमाणे यावर्षीही ग्राहकांच्या आवडीचा विचार करून पणती, रांगोळी, , मिठाई व गृहपयोगी वस्तूंचे वेगवेगळे स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. ग्राहकांना आकर्षक दरात वस्तू मिळाव्यात यासाठी ५ ते 66 टक्क्यांपर्यंत सवलती देण्यात आल्या आहेत.

ग्राहकांना आकर्षक भेटी आणि सवलती मिळाव्यात यासाठी रु. 5000/- पेक्षा जास्त खरेदीवर विशेष भेटवस्तू योजना, तसेच BUY 1 GET 1 FREE ऑफर्ससह खास “दिवाळी बंपर धमाका ऑफर” देण्यात आली आहे.

🔸 खास ऑफर्स आणि भेटवस्तू (BUY 1 GET 1 FREE):

  • गुलाबजाम (गोवर्धन / हळदिराम)
  • रसगुल्ला 200 ग्रॅम
  • कॉर्नफ्लेक्स आणि कॉफी सुप
  • मिक्स मिठाई, काजू कतली, सोनपापडी, मोंगडा
  • स्मार्टिज मॅजिक बिस्कीट ६५ ग्रॅम
  • स्मार्टिज चॉकलेट वॅफर, स्मार्टीज ऑरिओ बिस्कीट
  • पाराशूट ऑइल (२०० मि.ली.)
  • एल.ई.डी. बल्ब (२ खरेदीवर १ मोफत)
  • ऑॅम्फॉन्स डिशवॉश, फ्लोअर क्लिनर, हँडवॉश, टॉयलेट क्लिनर, ग्लास क्लिनर
  • रामबाण हिंग ४० ग्रॅम, रामबाण केचअप ९०० ग्रॅम, रामबाण कसुरी मेथी १०० ग्रॅम
  • हिमालया शॅम्पू (कोको / अ‍ॅलो कुकुंबर – ४०० मि.ली.)

🔸 अतिरिक्त सवलती:

  • राजगिरा चकली साहित्यावर – २०% सूट
  • सुर्यमुखी चकली साहित्यावर – १५% सूट
  • रामबाण चकली साहित्यावर – १५% सूट
  • निसर्गधारा चकली साहित्यावर – १५% सूट

🔸 विशेष उपलब्धता:

  • सर्व प्रकारचे बदाम, बी, खजूर, खारीक, सुगंधी इत्र व पूजा साहित्य सवलतीच्या दरात उपलब्ध.
  • आकर्षक गिफ्ट पॅक्सकॉम्बो पॅक्स व सणासुदीच्या गरजांनुसार भेटवस्तूंची खास विभागणी.

या सर्व ऑफर्स अकलूजच्या मुख्य शाखेसह तालुक्यातील सर्व ८ शाखांमध्ये उपलब्ध असल्याचे व्यवस्थापक गोपाळराव माने-देशमुख यांनी सांगितले.

या उपक्रमाच्या शुभारंभ सोहळ्यात सर्व संचालक, कर्मचारी, ग्राहक आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!