Latest News

अकलूज पोलिस ठाण्यात सत्यनारायण पूजा; शासकीय ठिकाणी धार्मिक कार्यक्रमावर प्रश्नचिन्ह

महर्षि डिजीटल न्यूज | सागर खरात 

अकलूज  : गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर उद्घाटन करण्यात अकलूज पोलिस स्टेशन अधिकच चर्चेत येऊन वादाच्या भोवऱ्यात सापडल्याचे दिसून येत आहे. अगोदरच कार्यक्षेत्राबाहेरील तेही राजकीय हितसंबंध असलेले व्यक्तीकडून उद्घाटन करून करून घेतल्यामुळे वेगळीच चर्चा सुरू असताना आता  शासकीय पोलिस ठाण्यात सत्यनारायण पूजेचे आयोजन करण्यात आल्याने वादाला तोंड फुटले आहे. सदरचे फोटो आणि व्हिडिओ आता समोर आले आहेत.

Oplus_16908288

कायद्याचे पालन करणारी आणि करवून घेणारी यंत्रणाच जर शासकीय ठिकाणी धार्मिक कार्यक्रम आयोजित करत असेल, तर सामान्य नागरिकांनी नेमके कोणते नियम पाळायचे? असा संतप्त सवाल आता नागरिकांमधून उपस्थित होत आहे. पोलिस ठाणे हे सर्व धर्मीयांसाठी समान असलेले सार्वजनिक केंद्र असताना, एका विशिष्ट धर्माच्या पूजेचे आयोजन करणे हे धर्मनिरपेक्षतेच्या मूलभूत तत्वांनाच छेद देणारे असल्याची टीका होत आहे.

याहून गंभीर बाब म्हणजे, या कार्यक्रमासाठी कोणती अधिकृत परवानगी घेण्यात आली होती का? शासकीय आचारसंहितेचे पालन झाले का? की नियमांना जाणीवपूर्वक बगल देण्यात आली? असे थेट प्रश्न उपस्थित होत आहेत. प्रशासनाकडून यावर अद्याप कोणतीही स्पष्ट भूमिका समोर आलेली नाही.

Oplus_16908288

काही जण या घटनेकडे ‘परंपरा’ म्हणून पाहत असले, तरी शासकीय पदावर असलेल्या अधिकाऱ्यांकडून अपेक्षित असलेली तटस्थता आणि जबाबदारी याबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत. उद्या अशाच पद्धतीने इतर धर्मांचे कार्यक्रमही शासकीय ठिकाणी घेतले गेले, तर त्याला परवानगी दिली जाईल का? असा मुद्दाही पुढे येत आहे.

Oplus_16908288

अकलूजमधील ही घटना केवळ एका कार्यक्रमापुरती मर्यादित नसून, शासकीय यंत्रणांच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह उभे करणारी ठरत आहे. आता यावर प्रशासन कोणती भूमिका घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!