Latest News

कावड धारकांसाठी मोठी बातमी: मुंगी घाटात Dysp संतोष वाळके यांची प्रत्यक्ष भेट; ‘या’ मार्गावर असणार चोख पोलीस बंदोबस्त

महर्षि डिजीटल न्यूज | सागर खरात 

​नातेपुते : प्रसिद्ध तीर्थक्षेत्र शिखर शिंगणापूर येथील चैत्र यात्रा २०२६ च्या पार्श्वभूमीवर भाविकांची सुरक्षितता आणि सोयीसुविधांचा आढावा घेण्यासाठी अकलूज विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO) संतोष वाळके यांनी मुंगी घाट परिसराला भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. कावड घेऊन येणाऱ्या भाविकांना प्रवासात कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी त्यांनी प्रशासनाला महत्त्वपूर्ण सूचना दिल्या आहेत.

​यात्रेदरम्यान होणारी गर्दी आणि कावड मिरवणुकांचे नियोजन लक्षात घेता, मुंगी घाट आणि परिसरात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यामध्ये खालीलप्रमाणे मनुष्यबळ तैनात असणार आहे:

​पोलीस अधिकारी: ०६

​पोलीस अंमलदार: ८२

​होमगार्ड: ३०

​विशेष पथक: पोलीस मुख्यालयाकडील ०१ आरसीपी (RCP) प्लाटून.

Dysp ​संतोष वाळके यांनी मुंगी घाटातील धोकादायक वळणे, भाविकांच्या विश्रांतीची ठिकाणे आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था याबाबत माहिती घेतली. कावड यात्रेकरूंना चढणीच्या मार्गावर कोणताही त्रास होऊ नये, यासाठी वाहतूक विस्कळीत होणार नाही याची काळजी घेण्याचे आदेश त्यांनी दिले.

​”शिखर शिंगणापूर यात्रा हा भाविकांच्या श्रद्धेचा विषय आहे. या काळात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये आणि प्रत्येक भाविकाला सुरक्षितपणे दर्शन घेता यावे, यासाठी पोलीस प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे.” — संतोष वाळके (SDPO, अकलूज)

यावेळी api विशाल वायकर, पोलीस हवालदार खाडे, पोलीस कॉन्स्टेबल गणेश  कापसे यांच्यासह पोलीस कर्मचारी, पदाधिकारी उपस्थित होते. प्रशासनाकडून करण्यात आलेल्या या नियोजनामुळे भाविकांमधून समाधान व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!