Latest News

गाढवाच्या पैशावरून थेट रक्तरंजित राडा ; दगड, लाथाबुक्क्या अन् पोलिसांत गुन्हा!

महर्षि डिजीटल न्यूज | सागर खरात 

नातेपुते : दोन वर्षांपूर्वी विकलेल्या गाढवाचे पैसे मागितल्याच्या कारणावरून वाद होऊन शिवीगाळ, मारहाण आणि दमदाटी केल्याची घटना नातेपुते येथील ज्योतिबानगर परिसरात घडली. याप्रकरणी लखन गंगाराम काळे (वय २७, रा. ज्योतिबानगर, नातेपुते) यांच्या फिर्यादीवरून पाच जणांविरुद्ध नातेपुते पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. २४ ऑगस्ट रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास फिर्यादी लखन काळे यांच्या घरासमोर हा प्रकार घडला. फिर्यादी यांनी त्यांचे नातेवाईक बापू हरिबा काळे यांच्याकडे सुमारे दोन वर्षांपूर्वी विकलेल्या गाढवाचे पैसे मागितले. याच कारणावरून वाद निर्माण झाल्याचा फिर्यादीत उल्लेख आहे.

फिर्यादीनुसार, बापू हरिबा काळे यांनी शिवीगाळ केली. त्यानंतर सुनील हरिबा काळे याने हातातील दगडाने लखन काळे यांच्या डोक्यात उजव्या कानाच्या वर मारून त्यांना जखमी केल्याचा आरोप आहे. तसेच संतोष हरिबा काळे, सीना बापू माने आणि विकास अजय माने यांनी फिर्यादींसह त्यांचे वडील गंगाराम काळे, आजोबा बबन काळे, भावजय दीपाली काळे आणि बहीण सोनाली सचिन माने यांना हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. संबंधितांनी शिवीगाळ व दमदाटी केल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

या प्रकरणी लखन गंगाराम काळे यांच्या फिर्यादीवरून बापू हरिबा काळे, सुनील हरिबा काळे, संतोष हरिबा काळे, सीना बापू माने आणि विकास अजय माने यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल रुपनवर करीत आहेत.

विशेष म्हणजे, दोन वर्षांपूर्वी विकलेल्या गाढवाच्या पैशावरून सुरू झालेल्या वादाचे रूप थेट हाणामारीत झाल्याने नातेपुते परिसरात या घटनेची चर्चा रंगली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!