वेळापूरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भव्य मिरवणुकीची तयारी; समितीची कार्यकारिणी जाहीर

महर्षि डिजीटल न्यूज | सागर खरात
वेळापूर : डॉ.बाबा साहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त वेळापूर येथे भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात येणार असून, त्या पार्श्वभूमीवर पंचशीलनगर येथे जयंती समिती २०२६ ची बैठक नुकतीच उत्साहात पार पडली.
ही बैठक वेळापूर ग्रामपंचायतीचे सरपंच रजनीश बनसोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती. बैठकीत जयंती सोहळ्याच्या नियोजनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात येऊन समितीची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
समितीच्या अध्यक्षपदी सतीश कांबळे, उपाध्यक्षपदी जिवा लोंढे, खजिनदारपदी रणजित सरवदे, कार्याध्यक्षपदी विश्वजीत बनसोडे, सचिवपदी अजित लोंढे, संपर्क प्रमुखपदी अण्णा बनसोडे, तर प्रसिद्धी प्रमुखपदी हर्षद बनसोडे व शंकर लोंढे यांची निवड करण्यात आली.
तसेच सदस्य म्हणून आदेश मोरे, गणेश धांडोरे, शुभम बनसोडे यांची निवड करण्यात आली असून दिलीप बनसोडे, विजयभाऊ बनसोडे, रविराज गायकवाड व भैया बाबर हे मार्गदर्शक म्हणून कार्य पाहणार आहेत.
भव्य मिरवणुकीच्या यशस्वी आयोजनासाठी मिरवणूक प्रमुख म्हणून नितीन लोंढे, राजकुमार बनसोडे, विलसन बनसोडे, रणजीत बनसोडे, सचिन उबाळे, हेमंत बनसोडे, शशिकांत लोंढे व अनिल कांबळे यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
दि. २६ एप्रिल २०२६ रोजी होणाऱ्या या मिरवणुकीस सर्व समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन जयंती समितीच्या वतीने करण्यात आले आहे. बैठकीस समाजातील जेष्ठ नागरिक व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



