शाळेच्या वसतिगृहात अकरावीत शिकत असलेल्या विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या
महर्षि डिजीटल न्यूज/किरण खरात
लोणंद : पाडेगाव ता खंडाळा गावच्या हद्दीत असणाऱ्या समता कनिष्ठ महाविद्यालयाचे मुलांचे वस्तीग्रह येथे अकरावीत शिकत असलेला विध्यार्थी देवराज प्रशांत धोतरे वय 16 रा अकलूज ता माळशिरस जी सोलापूर याने गळफास घेऊन आत्महत्या केली असून या घटनेची नोंद लोणंद पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली आहे आत्महत्या का व कशासाठी केली याचा पोलीस शोध घेत आहेत.
याबाबत लोणंद पोलीस स्टेशनवरून मिळालेली अधिक माहीती अशी की बुधवारी रात्री 2.14 वाजण्याच्या सुमारास पाडेगाव तालुका खंडाळा गावचे हद्दीत समता कनिष्ठ महाविद्यालयाचे मुलांचे वस्तीग्रह रूम नंबर 1 मध्ये देवराज प्रशांत धोतरे वय 16 वर्ष रा. अकलूज ता. माळशिरस जि सोलापूर हा शाळेच्या बाजूला असणाऱ्या वसतिगृहाच्या खोलीतच खिडकीच्या लोखंडी गजाला दोरउडीच्या मदतीने गळफास घेऊन मयत झाला आहे. अशी वर्दी विशाल विजय जाधव यांनी लोणंद पोलीस स्टेशनला दिली असून लोणंद पोलीस स्टेशनमध्ये याची नोंद करण्यात आली आहे.
गुरुवारी प्राथमिक आरोग्य केंद्र लोणंद येथे मृतदेहाचे शविच्छेदन करून देवराज याचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला तसेच या घटनेचा अधिक तपास पो हवा भिसे हे करीत आहेत.