Latest News

“हे दोन खोल्यांचं घर नाही, संस्कारांची शिदोरीच!” ;  अकलूजमध्ये रोहित पवार का झाले भावूक?

महर्षि डिजीटल न्यूज | सागर खरात 

अकलूज : येथील सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखान्याशी पवार कुटुंबाच्या जुळलेल्या जुन्या आठवणींना उजाळा देताना आमदार रोहित पवार भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. कारखान्यावर काही वर्षे एमडी म्हणून कार्यभार सांभाळणारे त्यांचे आजोबा डॉ. अप्पासाहेब पवार ज्या घरात वास्तव्यास होते, त्या घराला रोहित पवार आणि त्यांचे वडील राजेंद्र पवार यांनी आवर्जून भेट दिली.

विशेष म्हणजे, अनेक वर्षांनंतरही हे घर आजही पूर्वीप्रमाणेच जतन करून ठेवण्यात आले आहे. या घराशी निगडित असंख्य आठवणी राजेंद्र पवार यांच्या मनात आजही ताज्याच असल्याने भेटीदरम्यान त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. घरातील प्रत्येक कोपऱ्याशी भावनिक नाते जोडले गेले असल्याचे यावेळी दिसून आले.

यावेळी बोलताना आमदार रोहित पवार म्हणाले, “हे दोन खोल्यांचं केवळ घर नाही, तर माझ्यासाठी संस्कारांची शिदोरी आहे. जमिनीवर राहून लोकांसाठी काम करण्याची प्रेरणा आणि साधेपणाची जाणीव मला अशाच अनुभवांतून मिळाली आहे.”

या भेटीमुळे अकलूजमधील सहकार क्षेत्राशी आणि त्या काळातील सामाजिक जिव्हाळ्याशी जोडलेल्या अनेक आठवणी पुन्हा एकदा ताज्या झाल्या. स्थानिकांमध्येही या भेटीची चर्चा रंगली असून पवार कुटुंबाच्या साधेपणाचे कौतुक होत आहे.

दरम्यान त्यांनी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील व सौ. नंदिनीदेवी मोहिते पाटील यांचीही शिवरत्न बंगला येथे जाऊन भेट घेत तब्येतीची विचारपूस केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!