Latest News

“विकासाची वारी, शिवसेना आपल्या दारी” अभियानाची पश्चिम महाराष्ट्रातून सुरुवात; प्रत्येक गावात शिवसेनेची शाखा उभारणार – भरतशेठ गोगावले

महर्षि डिजीटल न्यूज | सागर खरात 

महाड : “गाव तिथे शाखा, घर तेथे शिवसैनिक” हा संकल्प घेऊन पश्चिम महाराष्ट्रात शिवसेनेचे संघटन अधिक मजबूत करण्यासाठी “विकासाची वारी, शिवसेना आपल्या दारी” हे विशेष अभियान राबविण्यात येणार असल्याची घोषणा रोजगार हमी, फलोत्पादन व खार जमीन विकास मंत्री आ. भरतशेठ गोगावले यांनी केली.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शिवसेना उपनेते मा. आमदार शहाजी बापू पाटील, सोलापूर जिल्हा निरीक्षक आ. संजय कदम, माढा लोकसभा संपर्क प्रमुख व डबल महाराष्ट्र केसरी आ. चंद्रहार पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे अभियान राबविण्यात येणार आहे.

दि. ११ मे २०२६ रोजी सकाळी ९ वाजता महाड येथील शिवनेरी बंगल्यावर शिवसेनेची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत मंत्री भरतशेठ गोगावले यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना गाव, शहर, वाड्या-वस्त्यांमध्ये प्रत्यक्ष भेटी देऊन शिवसेनेच्या शाखा उभारण्याचा निर्धार व्यक्त केला. तसेच विविध विकासकामांचा आढावा घेऊन जनतेशी थेट संवाद साधण्यावर भर देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

बैठकीदरम्यान कार्यकर्त्यांनी केलेल्या संघटनात्मक कामाचे मंत्री गोगावले यांनी विशेष कौतुक केले. तसेच कुस्ती क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवून शिवसेनेचे नाव उंचावणारे भीमराव भुसनर पाटील यांचे चिरंजीव पैलवान अजय आणि सुजय यांचा वैभवशाली सत्कार करण्यात आला. विविध कुस्ती स्पर्धांमध्ये ट्रॉफी व गदा पटकावल्याबद्दल मंत्री गोगावले यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी शिवसेना ओबीसी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष भीमराव भुसनर पाटील, भारतीय दलित महासंघाचे प्रदेशाध्यक्ष तथा सोलापूर जिल्हा उपप्रमुख दादासाहेब लोखंडे, माळशिरस तालुका प्रमुख व खंडकरी शेतकरी सेनेचे नेते तथा शासकीय समिती सदस्य तानाजी भोसले, भोळे पाटील, पैलवान सादिक पठाण, विद्यार्थी शिवसेनेचे शिवदत्त भोळे पाटील, माळशिरस तालुका ओबीसी प्रमुख शहाजी काळे, विक्रम काशीद, शुभम राऊत, अमीर शेख आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!