Latest News

सुमित्रा पतसंस्थेच्या चेक बाऊन्स प्रकरणात माळशिरस न्यायालयाचा मोठा निर्णय ; आरोपीस 5 महिने शिक्षा व 10 लाख रु.दंड.

महर्षि डिजीटल न्यूज / सागर खरात 

अकलूज : खोटे चेक देऊन फसवणुकीच्या प्रकरणाला आळा घालण्यासाठी केलेल्या कायद्याला आज माळशिरस मध्ये यश मिळाले असून तब्बल सात वर्ष चाललेल्या या केस मध्ये ॲड.नितीन खराडे यांना आरोपीला शिक्षा देण्यात यश मिळाले आहे. माळशिरस न्यायालयाने आरोपीस 5 महिने शिक्षा व 10 लाख रु.दंड. ठोठावला आहे. 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार अकलूज येथील सुमित्रा नागरी सहकारी पतसंस्थे कडून घेतलेल्या कर्ज प्रकरणी अकलूज येथील व्यापारी अब्दुल अलीअजगर बोहरी यांनी पतसंस्थेस रू.650,000/00 रू. चा चेक दिला होता. तो बाऊन्स झालेने पतसंस्थेने ॲड.नितीन खराडे यांचे मार्फत माळशिरस न्यायालयात फिर्याद दाखल केली होती. त्याची सुनावणी न्यायाधीश यु.बी.पेठे यांचे समोर होऊन न्यायाधीशांनी चेक बाऊन्स प्रकरणी आरोपी अब्दुल अलीअजगर बोहरी यास दोषी धरून 5 महिने शिक्षा व  10 लाख रु. दंड ठोठावला. 

सुमित्रा पतासंस्थेकडून ॲड.नितीन खराडे यानी व आरोपीकडून ॲड.कुबेर फरकांडे यांनी काम पाहिले. ॲड.नितीन खराडे यांचे पतसंस्थेचे ज्येष्ठ संचालक जयसिंह मोहिते पाटील यांनी अभिनंदन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!