Latest News

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी रामचंद्र मस्के यांची निवड

महर्षि डिजीटल न्यूज/सागर खरात 

अकलूज : सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उपाध्यक्षपदी उंदरगाव तालुका माढा येथील नेते रामचंद्र (काका) मस्के यांची निवड करण्यात आली आहे.

दांडगा जनसंपर्क व धडाडीचे कार्यकर्ते म्हणून रामचंद्र मस्के माढा तालुक्यात परिचित आहेत. सोलापूर जिल्हा व पर्यायाने माढा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जाळे निर्माण करण्यासाठी रामचंद्र (काका) मस्के यांच्यावर जिल्हा उपाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष रवींद्र पाटील यांनी त्यांची निवड जाहीर केल्यानंतर आज खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले यावेळी यावेळी कार्याध्यक्ष रवींद्र पाटील,  युवा नेते शिवतेजसिंह मोहिते पाटील, गोविंद भाऊ पवार उपस्थित होते.

यावेळी बोलताना रामचंद्र मस्के म्हणाले पक्षाचे अध्यक्ष शरद चंद्र पवार माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा विचार तळागाळात पोहोचवून खासदार धैर्यशील मोहिते पाटील व शिवतेजसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी विधानसभा निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या निवडून आणण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!