अ ‘शोक’ झालेल्या मेव्हण्याला वाचवण्यासाठी सरसावले वीर चे ‘कर’‘शक्ती’ हिन झालेल्या बिचार्या बेंद रे ला बनवले बळीचा बकरा?

महर्षि डिजीटल न्यूज
अकलूज : आपण केलेल्या पापाची शिक्षा दुसर्याला भोगायला लावणार्या प्रांतअधिकारी तथा भूसंपादन अधिकार्याच्या कार्यालयातील ‘मास्टर माईंड’ चे कारनामे हळूहळू चव्हाट्यावर येऊ लागल्याने या प्रक्रियेत किती मोठा ‘सावळा गोंधळ’ झालेला असेल याचा अंदाज लावणेही ‘अशो’क्य झाले आहे. अशातच आपल्या मेव्हण्याने केलेल्या ‘कारेनाम्या’ला पाठीशी घालण्यासाठी कार्यालयातील एका ‘वीर’ चे ’कर’ सरसावल्यामुळे ‘शक्ती’ हिन झालेल्या बिचार्याला ‘बेंद’ रे ला कामावरून पायउतार व्हावे लागले आहे.
याबाबत मिळालेल्या खात्रीशिर माहिती नुसार, कार्यालयातील मास्टर माईंड ‘विरा’ च्या ‘करा’ने आपला मेव्हणा असलेल्या अ‘न’मोल ला हाताशी धरून अनेक प्रकरणात कमीशन, टक्केवारी च्या मार्फत प्रचंड ‘माया’ जमवली आहे. तत्कालीन प्रांतअधिकारी नामदेव टिळेकर यांची बदली झाल्याच्या दरम्यानच्या काळात 2017 ते 2021 च्या दरम्यान सवतगव्हाण व तांबवे येथील पाईपलाईनचे कथित ‘बोगस’ मुल्यांकनावर तत्कालिन एमजीपी च्या अधिकार्याच्या जबरदस्तीने सह्या असल्याची पक्की माहिती महर्षि डिजीटल न्यूज ला मिळाली आहे.
यासाठी संबंधित शेतकर्यांकडून ‘विरा’च्या कराने अ‘न’मोल च्या व सवतगव्हाणच्या एजंटच्या मदतीने अगोदरच ठराविक रकमा उकळून घेतल्या आहे. त्यामुळे त्या शेतकर्यांचा प्रश्न प्रांतअधिकारी साहेब जायच्या अगोदर मार्गी लावण्याच्या उद्देशाने रातोरात निवाडे बनवले. तसेच ऑक्टोंबर-नोव्हेबंर महिन्यामध्ये करण्यात आलेल्या संयुक्त मोजणीमध्ये पाईपलाईनच्या परीशीष्ठ 16 ला नोंदी लावण्यासाठी प्रत्येक शेतकर्यांकडून 10 ते 20 हजार रूपये पुन्हा उकळले. ही बाबत संबंधित प्रांतअधिकारी साहेबांच्या लक्षात आल्यानंतर मास्टर माईंड ‘अ’शोक च्या शातीर बुध्दीने आपल्या अ‘न’मोलचे ‘करे’ वर केले व आपल्या एजंट च्या मदतीने ‘शक्ती’ हिन असलेल्या ‘बेंद’ रे ला नाहक बळीचा बकरा बनवले.
या सारख्या अनेक प्रकरणात आपले ‘कर’ काळे केलेल्या दाजी व मेव्हण्याची सखोल चौकशी होणे गरजेचे असून यासाठी महर्षि डिजीटल न्यूज च्या माध्यमातून आम्ही पुढील काळात अ‘न’मोल वीरां च्या करा अकडलेल्या शेतकर्यांना न्याय मिळवून देण्यासाठी नुतन प्रांतअधिकारी यांच्यासह राष्ट्रीय महामार्ग विभाग, महसूल विभागाच्या मंत्रालयापर्यंत पाठपुरावा करणार आहे. (क्रमश:)



