धैर्यशील मोहिते पाटील यांच्या वादळामुळे विरोधक झाले बेजार ; कुठेच काही चाले ना म्हणून घेतला फेक अकाउंट चा आधार ?

महर्षि डिजीटल न्यूज/ सागर खरात
अकलूज : सध्या लोकसभा निवडणुकीचा धुरळा उडलेला आहे. हा धुरळा उडण्या अगोदरच धैर्यशील मोहिते पाटील यांनी संपूर्ण माढा मतदारसंघात आपल्या तुफानाने विरोधकांना बेजार केले आहे. सोशल मीडियावर देखील धैर्यशील मोहिते पाटील सध्या ट्रेंडिंग वर असलेले पाहायला मिळत आहेत. अशातच बुचकळ्यात सापडलेल्या विरोधकांना मात्र फेक अकाउंट चा आधार घ्यावा लागत असल्याचे चित्र बोलले जात आहे.
सध्या सोशल मीडिया आहे प्रचाराचे प्रभावी माध्यम समजले जाते अशातच सोशल मीडियावर आपापल्या नेत्यांचा प्रचार समर्थक मोठ्या उत्साहाने करताना दिसत आहेत. आरोप प्रत्यारोप सोशल मीडियातून व्हाट्सअप फेसबुक इंस्टाग्राम वर होत आहेत.
आपापल्या नेत्याचा प्रचार या माध्यमातून मोठ्या खुबीने होताना दिसत असताना खासदार रणजितसिंह निंबाळकर यांचे ऑफीशियल फेसबुक पेज, इंस्टाग्राम पोस्ट शेअर फेक परराज्यातील मुलींच्या नावाने काढलेल्या आकांऊटच्या माध्यमातून होत आहेत. विरोधकांना ट्रोलिंग करण्यासाठी देखील या फेक आकाऊटसचा वापर केला जात असल्याचे निदर्शनास येत आहे. खासदार निंबाळकर यांच्या पीआर एजन्सीकडून जाणीवपूर्वक फेक आकांऊटचा वापर तर केला जात नसेल अशी चर्चा देखील सोशल मिडीयावर रंगली आहे.
खासदार निंबाळकरांच्या निष्क्रियतेमुळे त्यांना सोशल मीडियावर देखील समर्थक मिळेनासे झालेले आहेत याच कारणामुळे त्यांना फेक सोशल मीडिया अकाउंट चा वापर करावा लागत आहे इतकी नामुश्की खासदार निंबाळकर यांच्यावर ओढावलेली तर नाही ना असा प्रश्न देखील सोशल मीडियातून उपस्थित केला जात आहे.