सभासदांना ५ किलो साखर ; कर्मचाऱ्यांना १५ दिवसांचा बोनस, श्री शंकर सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम शुभारंभ

महर्षि डिजीटल न्यूज | सागर खरात

सदाशिवनगर : श्री शंकर सहकारी साखर कारखाना लिमिटेड, सदाशिवनगरच्या सन २०२६-२७ गळीत हंगामाचा बॉयलर अग्नीप्रदीपन, काटा पूजन व गळीत हंगाम शुभारंभाचा कार्यक्रम महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह शंकरराव मोहिते-पाटील व त्यांच्या पत्नी नंदिनीदेवी विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या शुभहस्ते उत्साहात संपन्न झाला.
कारखान्याचे चेअरमन रणजितसिंह मोहिते-पाटील व त्यांच्या पत्नी सत्यप्रभादेवी रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते बॉयलर अग्नीप्रदीपन करण्यात आले. काटा व बैलगाडी पूजन सहकार महर्षी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष शंकरराव माने-देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. सत्यनारायण पूजन कारखान्याचे संचालक दादासाहेब वाघमोडे-पाटील व त्यांच्या पत्नी शोभा वाघमोडे-पाटील यांच्या हस्ते झाले.

यावेळी कै. सहकार महर्षी काकासाहेब, अक्कासाहेब व कै. पप्पासाहेब यांच्या प्रतिमांचे पूजन कारखान्याचे ज्येष्ठ सभासद यशवंत धोंडीबा दुधाळ यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच ऊस वाहतूक बैलगाडी मुकादम व ऊस उत्पादक सभासदांचा चेअरमन रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमात बोलताना चेअरमन रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी कारखान्यातील कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त १५ दिवसांचा पगार बोनस देण्याची घोषणा केली. तसेच ऊस उत्पादक सभासदांनी कारखान्याला पुरवठा केलेल्या उसाच्या प्रमाणानुसार प्रति टन अर्धा किलो साखर देण्यात येणार असल्याचे सांगितले. कारखान्याच्या सभासदांना ५ किलो साखर सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्याची घोषणाही त्यांनी केली.यावेळी ऊस उत्पादक सभासद व शेतकऱ्यांनी कारखान्याला जास्तीत जास्त ऊस पुरवठा करावा, असे आवाहन करण्यात आले.

कार्यक्रमास कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते-पाटील, कारखान्याचे उपाध्यक्ष मिलिंद कुलकर्णी, जिल्हा परिषद सदस्य अर्जुनसिंह मोहिते-पाटील, विश्वतेजसिंह मोहिते-पाटील, शिवांशिका विश्वतेजसिंह मोहिते-पाटील, प्रकाश आप्पा पाटील, अॅड. शिवाजीराव पिसाळ, पंचायत समिती सभापती दत्तात्रय मगर, शिवामृत दूध उत्पादक संघाचे उपाध्यक्ष दत्तात्रय भिलारे, माजी पंचायत समिती सदस्य तुकाराम देशमुख, माजी उपसभापती प्रतापराव पाटील, माजी उपनगराध्यक्ष भीमराव रेडे-पाटील, जिल्हा परिषद सदस्य मारुती लोंढे आदींसह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
याशिवाय राहुल बापू वाघमोडे, पंचायत समिती सदस्य आप्पासाहेब पाटील, प्रवीण वाघमोडे, मानसिंग मोहिते, अभिमान सावंत, मधुकर वाघमोडे-पाटील, आरपीआय पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सोमनाथ भोसले, आरपीआय तालुकाध्यक्ष मिलिंद सरतापे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष देविदास ढोपे, सहकार महर्षी साखर कारखान्याचे संचालक विजयकुमार देशमुख, सुरेश बापू पाटील, तात्यासाहेब एकतपुरे, धनंजय सावंत, शिवामृत दूध उत्पादक संघाचे संचालक सचिन रणनवरे, भास्कर तुपे, जगन्नाथ जाधव, शरद साळुंखे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक लक्ष्मण तात्या पवार, लखन चव्हाण, अॅड. नितीन मामा खराडे, सचिन साळुंखे, विराज निंबाळकर, चंद्रकांत शिंदे, दत्ता चव्हाण यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
सरपंच वीरकुमार दोशी, एकनाथ शिंदे, बाळासाहेब कदम, विष्णुपंत घाडगे, बाबासाहेब इंगळे, अनिल वाघमोडे, नारायण ताटे-देशमुख, हर्षाली निंबाळकर, संदीप नरळे, विलास फडतरे, कल्याण हुलगे, माऊली सुळ, भोजराज माने, शिवराज निंबाळकर, विठ्ठल तात्या अर्जुन, बिनू पाटील, उत्तम माने, दीपक माने-देशमुख, अभिषेक वाघमोडे-पाटील, गोरख जानकर, विलास आद्रट, एकनाथ वाघमोडे, हनुमंत साळुंखे, राहुल दुधाळ, संतोष महामुनी, पत्रकार सुरेश शेंडे, तानाजी वाघमोडे, रामदास काळे, हनुमंत झजे, अनिकेत पवार, बाबुराव तरंगे आदींचीही उपस्थिती होती.
कार्यक्रमास श्री शंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक व माजी संचालक, सहकार महर्षी कारखान्याचे संचालक, शिवामृत दूध उत्पादक संघाचे संचालक, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विविध कार्यकारी सोसायट्यांचे चेअरमन, व्हा. चेअरमन व संचालक, विविध संस्थांचे पदाधिकारी, शेतकरी सभासद, कारखान्याचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर स्वरूप देशमुख, कार्यकारी संचालक अभिजित डुबल, सहकार महर्षी कारखान्याचे कार्यकारी संचालक सुहास यादव, शिवामृत दूध संघाचे कार्यकारी संचालक रविराज इनामदार, अधिकारी, कर्मचारी, व्यापारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



