शहर

हॉटेल मराठा दरबारचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या हस्ते उद्घाटन 

महर्षि डिजीटल न्यूज 

अकलूज : दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर अकलूज येथे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या हस्ते “हॉटेल मराठा दरबार”चे उद्घाटन मोठ्या थाटामाटात संपन्न झाले. या सोहळ्यास पंचायत समितीचे माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील यांच्यासह डॉक्टर्स, स्थानिक व्यापारी, उद्योजक, तसेच इतर अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यशवंतनगर येथील हॉटेल श्री दत्त तसेच भाऊंची खानावळ चे मालक दत्तात्रय ननवरे व प्रणव ननवरे यांनी अकलूज येथील शंभर फुटी बायपास, कृष्णप्रिया हॉल च्या समोर  नव्याने सुरू केलेले हॉटेल मराठा दरबार हे अकलूजमध्ये आधुनिक सोयी-सुविधांनी सज्ज असून, पर्यटक आणि स्थानिकांसाठी उच्च दर्जाच्या सेवा उपलब्ध करून देण्याचा त्याचा उद्देश आहे. 

हॉटेलमध्ये स्पेशल खेकडा फ्राय चिकन थाळी मटण थाळी मच्छी तसेच शुद्ध शाकाहारी जेवणाचे विविध चविष्ट पदार्थ उपलब्ध असणार आहेत. त्यामुळे खवय्यांसाठी हॉटेल दरबार ही एक पर्वणीच असणार आहे. उद्घाटन सोहळ्यानंतर उपस्थित मान्यवरांनी हॉटेलमधील विविध सेवा व सुविधा अनुभवल्या आणि हॉटेलच्या यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!