Latest News

सहकार महर्षि ६३ वा बॉयलर अग्नी प्रदिपन समारंभ संपन्न ; ९ लाख मे.टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट

महर्षि डिजीटल न्यूज 

अकलूज : येथील सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखान्याचा सन २०२४-२५ चा ६३ वा बॉयलर प्रदिपन समारंभ गुरुवार दि.२४/१०/२०२४ रोजी सकाळी १०.०० वाजता कारखान्याचे चेअरमन जयसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांचे शुभहस्ते संपन्न झाला.

कारखान्याने चालू गळीत हंगाम २०२४-२५ मध्ये ९ लाख मे. टन ऊस गाळप करण्याचे उद्दिष्ठ ठेवलेले आहे. त्यासाठी सर्व गशिनरीच्या ट्रायल्स पुर्ण झालेल्या असून प्रतिदितशी ८,५०० मे. टनापेक्षा जारत ऊस गाळप करण्यासाठी यंत्रप्रणाली कार्यान्वीत केली आहे. त्यानुसार ऊस तोडणी व वाहतूक यंत्रणा भरलेली असून कारखान्याचे सर्व सभासद व बिगर सभासद यांनी गोंदीचा व बिगर नोंदीचा सर्व ऊस कारखान्यास देऊन सहकार्य करावे असे आवाहन करून मागील गळीत हंगाम २०२३-२०२४ मध्ये गळीतास आलेल्या ऊसाकरीता ठरलेल्या धोरणाप्रमाणे अनुदानाची रक्कम ऊस पुरवठादार शेतकरी यांचे खातेवर जमा केली असून व परंपरेप्रमाणे कारखाना कर्मचारी गांना बोनस देण्यात आला असल्याचे कारखान्याचे कार्यकारी संचालक राजेंद्र चौगुले यांनी सांगितले.

 बॉयलर प्रदिपन समारंभानिमित्त श्रीसत्यनारायण महापूजा कारखान्याचे संचालकसाहेब रामचंद्र बाबा ठवरे व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. कुसुम रामचंद्र ठवरे या उभयतांचे शुभहरते संपन्न झाली.

यावेळी कारखान्याचे व्हाईस चेअरमन शंकरराव माने-देशमुख, संचालक लक्ष्मण शिंदे, नानासाहेब गुंडफणे, विजयकुमार पवार, रागचंद्र सिद, विराज निंबाळकर, रावसाहेब पराडे, भिमराव काळे, गोविंद पवार, तज्ञ संचालक प्रकाशराव पाटील, रामचंद्रराव सावंत-पाटील, संचालिका सुजाता शिंदे, कार्यलक्षी संचालक रणजित रणनवरे, शिवसृष्टी किल्ला व शिवछत्रपत्ती मल्टिमेडीया लेजर शो कमिटी संचालक पांडूरंग एकतपुरे, बाळासाहेब माने-देशमुख, विनायक केचे, राजेंद्र भोसले, अमृतराज माने-देशमुख, धनंजय सावंत, नामदेव चव्हाण, अनिलराव कोकाटे, श्रीकांत बोडके, सौ. हर्षाली निंबाळकर, माजी संचालक भिमराव काळे, केशव ताटे, सुभाष पताळे, शिवाजीराव सिंद, राजेंद्र मोहिते, महादेवराव घाडगे, विजय माने-देशमुख, रामचंद्र चव्हाण, नितीन निंबाळकर तसेच सभासद, खातेप्रमुख, कामगार, कामगार व युनियन प्रतिनिधी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!