युवासेनेतर्फे अकलूजमध्ये कष्टकरी महिलांचा सन्मान; जागतिक महिला दिनानिमित्त आगळावेगळा उपक्रम

महर्षि डिजीटल न्यूज | सागर खरात
अकलूज : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत युवासेनेतर्फे अकलूज येथे कष्टकरी महिलांचा सन्मान करून आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला. युवासेना सोलापूर जिल्हाप्रमुख गणेश इंगळे यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
महिला दिन केवळ भाषणापुरता मर्यादित न ठेवता प्रत्यक्ष कृतीतून महिलांचा सन्मान व्हावा, या भावनेतून अकलूजमधील रस्त्यावर बसून ऊन-पावसात कष्ट करणाऱ्या भाजी विक्रेत्या महिला, बांगड्या विकणाऱ्या महिला, केरसुनी विक्रेते महिला तसेच हातावर पोट असलेल्या गोरगरीब कष्टकरी भगिनींचा सन्मानपूर्वक गौरव करण्यात आला.
समाजाचा खरा कणा असलेल्या या कष्टकरी महिलांचा सन्मान करणे हीच खऱ्या अर्थाने महिला दिनाची मोठी भेट असल्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
या वेळी युवा सेना उपतालुकाप्रमुख दत्ताभाऊ साळुंखे, महाराष्ट्र एसटी कामगार संघटना आगाराध्यक्ष विद्याताई साळुंखे, युवा सेना उपशहरप्रमुख अकलूज युवराज पवार, सचिन भोसले, दादासाहेब साळुंखे आदी उपस्थित होते.



