Latest News

आनंदराज आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त अकलूजमध्ये रुग्ण व गरजू मुलांना फळे-बिस्किटांचे वाटप

महर्षि डिजीटल न्यूज | सागर खरात 

अकलूज : इंदू मिल प्रकल्पाचे प्रणेते तथा रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांच्या २ जून रोजी होणाऱ्या वाढदिवसानिमित्त रिपब्लिकन सेना माळशिरस तालुक्याच्या वतीने उपजिल्हा रुग्णालय, अकलूज येथे समाजोपयोगी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांतर्गत रुग्ण तसेच गरजू लहान मुलांना आंबा, केळी व बिस्किटांच्या किटचे वाटप करण्यात आले.

युवा नेते ॲड. अमन आंबेडकर आणि रिपब्लिकन सेनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. सुशील सूर्यवंशी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी लहान मुलांच्या हस्ते केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यामुळे कार्यक्रमाला भावनिक आणि आनंददायी स्वरूप प्राप्त झाले.

रिपब्लिकन सेनेचे महाराष्ट्र प्रदेश सचिव सोमनाथ अरुण भोसले यांच्या हस्ते रुग्णांना फळे व बिस्किटांच्या किटचे वितरण करण्यात आले.

यावेळी बोलताना सोमनाथ भोसले म्हणाले, “आनंदराज आंबेडकर हे समाजातील वंचित, गरीब आणि दुर्बल घटकांसाठी सातत्याने कार्य करणारे नेतृत्व आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त केवळ उत्सव साजरा न करता समाजोपयोगी कार्यातून जनसेवा करण्याचा आमचा प्रयत्न आहे. गरजूंच्या चेहऱ्यावर आनंद फुलविणे आणि समाजात सकारात्मक परिवर्तन घडविणे हेच या उपक्रमामागील मुख्य उद्दिष्ट आहे.”

या कार्यक्रमास उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. ओहाळ, रिपब्लिकन सेनेचे माळशिरस तालुकाध्यक्ष विश्वास उगाडे, युवक तालुकाध्यक्ष विकी लोंढे, पंढरपूर तालुका उपाध्यक्ष गणेश गायकवाड, अकलूज शहराध्यक्ष शिवाजी खडतरे, शहर उपाध्यक्ष साजिद बागवान, तालुका सरचिटणीस दयानंद कांबळे, तालुका संपर्कप्रमुख राजू बागवान, अकलूज शहर कार्याध्यक्ष रवी कोळी तसेच अरुण कोळी, जगू कोळी, अर्जुन कोळी, सागर कोळी, अर्जुन जाधव यांच्यासह रिपब्लिकन सेनेचे पदाधिकारी आणि भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!