Latest News

पर्यावरणासाठी संकल्प, विद्यार्थ्यांसाठी मदतीचा हात ; फ्रटेली वाईन्स आणि मोहिते-पाटील परिवाराचा स्तुत्य उपक्रम

महर्षि डिजीटल न्यूज | सागर खरात 

अकलूज : जागतिक पर्यावरण दिन तसेच महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील आणि माजी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त फ्रटेली वाइन्स प्रायव्हेट लिमिटेड, झंजेवाडी (खुडूस) येथे वृक्षारोपण आणि शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वितरणाचा सामाजिक उपक्रम उत्साहात संपन्न झाला.

पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी शालेय साहित्याचे वाटप करून शिक्षण क्षेत्रालाही हातभार लावण्यात आला. या उपक्रमामुळे पर्यावरण संरक्षण आणि सामाजिक बांधिलकीचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला.

या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटीलनंदिनीदेवी विजयसिंह मोहिते-पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते-पाटीलकांचनमालादेवी मदनसिंह मोहिते-पाटील, माजी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटीलसत्यप्रभादेवी रणजितसिंह मोहिते-पाटील, फ्रटेली वाइन्सचे संचालक अर्जुनसिंह मोहिते-पाटील, माजी सभापती वैष्णवीदेवी मोहिते-पाटीलसंयुक्ता अर्जुनसिंह मोहिते-पाटीलरुद्रवीर अर्जुनसिंह मोहिते-पाटील यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

तसेच बाबासाहेब इंगळेशिवराज निंबाळकर, प्लांट हेड (जनरल मॅनेजर) दत्तात्रय घुले, सीनियर मॅनेजर ऑपरेशन विनायक महाजन, सीनियर मॅनेजर प्लांटेशन डिव्हिजन संदीप मगर, सीनियर मॅनेजर क्वालिटी लहूकुमार डांगरे, मॅनेजर ह्यूमन रिसोर्स (एचआर) विनोद पाटील, सिक्युरिटी अँड सेफ्टी ऑफिसर साधू येळे तसेच फ्रटेली वाइन्सचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वाढदिवसाचे औचित्य साधून पर्यावरण संवर्धन आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजांना प्राधान्य देणारा हा उपक्रम परिसरात विशेष चर्चेचा विषय ठरला. वृक्षारोपणातून हरित भविष्यासाठीचा संकल्प आणि शैक्षणिक साहित्य वितरणातून विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठीचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!