Latest News

कोळेगावात शिवतेजसिंह मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त खाऊ वाटप; विद्यार्थ्यांसोबत उत्साहात साजरा झाला सोहळा

महर्षि डिजीटल न्यूज 

कोळेगाव : मौजे कोळेगाव येथे शिव–कीर्ती युवा मंच शाखा कोळेगावच्या वतीने अकलूज नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष शिवतेजसिंह मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व अंगणवाडी शाळा, कोळेगाव येथे विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून अभिष्टचिंतन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाला शिवसृष्टी मल्टीमीडिया लेझर शोचे संचालक धनंजय (भाऊ) दुपडे तसेच अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नितीन सावंत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी नितीन सावंत यांनी शिवतेजसिंह मोहिते पाटील यांच्या कार्याचा आढावा घेताना सांगितले की, सामाजिक, शैक्षणिक आणि उद्योग क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. कमी वयात विविध संस्थांमध्ये काम करण्याची संधी मिळाल्यानंतर त्या संधीचे सोनं करत त्यांनी अकलूज नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदापर्यंत मजल मारली आहे. पुढील वाटचालीसाठी त्यांनी त्यांना उदंड आयुष्य व शुभेच्छा दिल्या.

या प्रसंगी पिलीव गावचे युवक सोहेल बागवान, शिव–कीर्ती युवा मंच शाखा कोळेगावचे अध्यक्ष सुभाष बंदपट्टे, दत्तात्रय गेजगे, रानोबा पारसे, संतोष धांडोरे, शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच कोळेगावमधील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून वाढदिवस साजरा केल्याने परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!