Latest News

28 फेब्रुवारी व 1 मार्च रोजी अकलूज येथे राज्यस्तरीय लावणी नृत्य स्पर्धेचे आयोजन

महर्षि डिजीटल न्यूज 

अकलूज : सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील जयंती समारंभ समिती    शंकरनगर अकलूज यांच्यावतीने दि. २८ फेब्रुवारी व दि. १ मार्च २०२६ रोजी स्मृतीभवन शंकरनगर अकलूज येथे राज्यस्तरीय लावणी नृत्य स्पर्धेचे आयोजन केले असल्याची माहिती अकलूज नगरपरिषदेचे नगरसेवक  सयाजीराजे मोहिते पाटील यांनी दिली.

   सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याच्या विश्रामगृहात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.

              पुढे बोलताना ते म्हणाले, जयंती समारंभ समितीचे संस्थापक अध्यक्ष जयसिंह मोहिते पाटील यांनी सहकार महर्षींचे अमृत महोत्सवी जयंती वर्ष जानेवारी १९९३ पासून राज्यस्तरीय लावणी नृत्य स्पर्धेला सुरुवात केली व सन २०१८ पर्यंत  अविरतपणे हा लावणीचा प्रवास  चालला. या स्पर्धेमुळे लावणी कलाकारांना परदेशात कार्यक्रम करण्याची संधी मिळाली. तर अनेक कलावंतांना चित्रपट, रियालिटी शो मधून काम मिळाले. महाराष्ट्रभर कलाकारांचा लौकिक प्राप्त झाला.अकलूजची लावणी देशा बरोबरच परदेशातही गेली.

        या लावणी स्पर्धाचा प्रवास समितीच्या अध्यक्षा कु. स्वरूपाराणी मोहिते पाटील यांनी पुढे सुरु ठेवण्याचे ठरवले. त्यानुसार सन २०२४ पासून सदरच्या स्पर्धेला पुन्हा जोमाने सुरुवात केली.व आजही या स्पर्धेचे नियोजन त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

         या वर्षीचे स्पर्धेचे  हे २९ वे वर्ष असून सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्या १०८ व्या जयंती निमित्त स्मृतीभवन शंकरनगर च्या बादशाही रंगमंचावर या स्पर्धा होत आहेत. या स्पर्धेत महाराष्ट्रातील एकूण ११  निवडक  पार्ट्यांना सहभाग देण्यात आला आहे. 

         पारंपारिक व नवकवींच्या लावण्यांचा नजराणा, ढोलकीची थाप, त्याला घुंगराची साथ, पदण्यासाची नजाकत, सोबतच पेटीची संगत यांचा अनुभव रसिकांना लाभणार आहे.

   या वेळी समितीचे  सुभाष दळवी, महादेव अंधारे, अशोक जावळे, विजय दोशी, पोपटराव भोसले पाटील, बिभिषन जाधव, संजय गळीतकर सुहास थोरात, सतीश यादव व समितीतील सदस्य  उपस्थित होते.

 प्रवेशिकासाठी ९७६४११३६९५    या क्रमांकावर संपर्क करण्याचे अवाहनही आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

या स्पर्धे साठीची भव्य पारितोषिके खालील प्रमाणे

प्रथम क्रमांकास रुपये तीन लाख, द्वितीय क्रमांकास रुपये दोन लाख, तृतीय क्रमांकास रुपये एक लाख,  तर उत्कृष्ट नृत्यांगना रुपये ५ हजार व कै. श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील स्मृती चषक, उत्कृष्ट अदा (वैयक्तिक) रुपये ५ हजार, उत्कृष्ट मुजरा रुपये ३ हजार, उत्कृष्ट ढोलकीपटू, उत्कृष्ट पार्श्वगायिका, उत्कृष्ट पेटीवादक, व उत्कृष्ट तबलावादक यांना प्रत्येकी रुपये १ हजार. अशी पारितोषिक देण्यात येणार आहेत

 स्पर्धेतील सहभागी पार्ट्या याप्रमाणे :

 शनिवार दिनांक २८ फेब्रुवारी  रोजी २०२६ रोजी

१) वैशाली समसापुरकर जय अंबिका सांस्कृतिक कला केंद्र, सणसवाडी.                                (२) काजल-स्वाती जळगावकर अलंकार सांस्कृतिक कला केंद्र, सुपा जि. अहिल्यानगर                        (३) बेला, श्रद्धा नेटूरकर  जय भवानी सांस्कृतिक कला केंद्र, खोसपुरी पंढरीचापूल जि. अहिल्यानगर                              (४) अपर्णा, कीर्ती नगरकर लक्ष्मी सांस्कृतिक कला केंद्र, सणसवाडी जि. पुणे                                     (५) गीता, श्रुती वाईकर रेणुका सांस्कृतिक कला केंद्र, गोकुळ शिरगाव ता. कागल जि. कोल्हापूर.

रविवार दिनांक १ मार्च २०२६ रोजी

(१) छाया, पूजा, श्रद्धा कोल्हापूरकर रेणुका सांस्कृतिक कला केंद्र,      अंबप वाठार जि. कोल्हापूर            (२) जोत्स्ना वाईकर पिंजरा सांस्कृतिक कला केंद्र, वेळे ता.वाई जि. सातारा                                (३)  नटरंग सांस्कृतिक कला केंद्र ग्रुप पार्टी, मोडनिंब ता. माढा जि. सोलापूर                                    (४) राजनंदिनी सांस्कृतिक कला केंद्र ग्रुप पार्टी, यवत चौफुला जि. पुणे                                           (५) वैष्णवी कोल्हापूरकर रेणुका सांस्कृतिक कला केंद्र, अंबप वाठार जि. कोल्हापूर                           (६) न्यू अंबिका सांस्कृतिक कला केंद्र ग्रुप पार्टी, यवत चौफुला जि. पुणे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!