प्रगतिशील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांशी धानुका तज्ज्ञांचा संवाद

महर्षि डिजीटल न्यूज
पिलीव : धानुका ॲग्रीटेक लिमिटेड चे दिल्ली येथील बुरशीनाशक उत्पादन पोर्टफोलिओ व्यवस्थापक श्री.साकेत कुमार यांनी प्रगतिशील शेतकरी गणेश आवताडे (रा. काळमवाडी) यांच्या निवासस्थानी आयोजित चर्चासत्रात माळशिरस तालुक्यातील कोळेगाव, फलवणी व काळमवाडी येथील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद साधला.
यावेळी त्यांनी डाळिंब पिकातील सध्याची परिस्थिती, रोग व कीड व्यवस्थापन, उत्पादनवाढ तसेच दर्जेदार फळनिर्मितीसाठी आवश्यक तांत्रिक बाबींवर सविस्तर मार्गदर्शन केले. त्यानंतर त्यांनी परिसरातील डाळिंब बागांना भेट देऊन पिकाची प्रत्यक्ष पाहणी केली आणि शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन केले तसेच सध्या बहुतांश डाळिंब बागा तोडणीच्या अवस्थेत असून, फळांची गुणवत्ता,आकर्षक चमक ,शायनिंग वाढविण्यासाठी लस्टर या बुरशीनाशकाची फवारणी करण्याचे आवाहन साकेत कुमार यांनी डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना केले.
या कार्यक्रमास धानुका कंपनीचे सोलापूर विभाग एरिया मॅनेजर प्रदीप बनसुडे,अकलूज विभाग टेरिटरी मॅनेजर दिपक वाघमोडे तसेच धानुका डॉक्टर धनाजी शिकारे यांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थित शेतकऱ्यांनी मार्गदर्शनाचा लाभ घेत विविध विषयांवर चर्चा केली.



