श्री शंकर सहकारी साखर कारखान्यात विजयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते रोलर रोलर पूजन ; गाळप हंगामाची जोरदार तयारी

महर्षि डिजीटल न्यूज | सागर खरात
सदाशिवनगर : श्री शंकर सहकारी साखर कारखाना लि., सदाशिवनगर येथे गळीत हंगाम 2026-27 च्या रोलर पूजनाचा कार्यक्रम शुक्रवारी (दि. 24 जुलै) अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या शुभहस्ते विधिवत रोलर पूजन करून नव्या गळीत हंगामाचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी कारखान्याचे चेअरमन तथा आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. उपस्थित मान्यवरांनी कारखान्याच्या यशस्वी गळीत हंगामासाठी शुभेच्छा व्यक्त करत ऊस उत्पादक शेतकरी, सभासद आणि कारखान्याच्या सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळे कारखान्याची प्रगती अधिक वेगाने होईल, असा विश्वास व्यक्त केला.
कार्यक्रमास व्हाइस चेअरमन ॲड. मिलिंद कुलकर्णी, जिल्हा परिषद सदस्य अर्जुनसिंह मोहिते-पाटील, युवा नेते विश्वतेजसिंह मोहिते-पाटील, ॲड. नितीन खराडे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे तालुकाध्यक्ष देवीदास ढोपे, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ भोसले, सरपंच विरकुमार दोशी, माजी उपसरपंच उदय धाईजे, विष्णु भोंगळे, शिवराज निबाळकर, एकनाथ वाघमोडे, सतीश फडतरे, शेतकरी संघटनेचे दत्ता भोसले, संतोष शिंदे, माऊली निबाळकर, बलभिम निंबाळकर, बबन भुजबल, तुकाराम चव्हाण, जगन्नाथ जाधव, सागर उरवणे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
तसेच कारखान्याचे संचालक दत्तुकाका रणनवरे, ॲड. सुरेश पाटील, महादेव शिंदे, बाळासाहेब माने, दादा पाटील, सुधाकर पोळ, शिवाजी गोरे, सुनिल माने, सदाशिव वाघमोडे-पाटील, रामदास कर्णे, रणजित पाटील, सचिन लोकरे, रामभाऊ खुळे, अर्जुन धाईंजे यांच्यासह कारखान्याचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर स्वरूप देशमुख, कार्यकारी संचालक अभिजित डुबल, जनरल मॅनेजर रविराज जगताप, चीफ इंजिनिअर समाधान कागदे, चीफ केमिस्ट अभिजित माने, शेतकी अधिकारी आनंदराव गायकवाड, डिस्टिलरी मॅनेजर संजय मोरे, डेप्युटी चीफ इंजिनिअर निलेश जाधव, लेबर ऑफिसर कैलास कदम, सिव्हिल इंजिनिअर राहुल मगर, सुरक्षा अधिकारी ज्ञानदेव पवार, परचेस ऑफिसर उत्तम सपकाळ, लिगल ऑफिसर पंकज फडतरे तसेच अधिकारी, कर्मचारी, सभासद, ऊस उत्पादक शेतकरी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम धार्मिक व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. नव्या गळीत हंगामात कारखाना अधिक कार्यक्षमतेने चालवून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना उत्कृष्ट सेवा देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.



