Latest News

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर अकलूज नगरपरिषदेकडून सफाई कर्मचाऱ्यांना सुरक्षा किटचे वितरण

महर्षि डिजीटल न्यूज | सागर खरात 

अकलूज : जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे अकलूज नगरीत आगमन होत असताना पावसाळ्याचे दिवस लक्षात घेऊन आरोग्य विभागातील सफाई कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी अकलूज नगर परिषदेने कौतुकास्पद उपक्रम राबविला. नगर परिषदेच्या आरोग्य विभागात कार्यरत असलेल्या १६० सफाई कर्मचाऱ्यांना रेनकोट, ऍप्रॉन, मास्क व हॅन्ड ग्लोज अशा सुरक्षा किटचे वितरण करण्यात आले.

सुरक्षा किटचे वितरण नगराध्यक्षा रेशमाताई अडगळे, उपनगराध्यक्ष शिवतेजसिंह मोहिते पाटील, मुख्याधिकारी सचिन पाटील तसेच नगरसेवक व स्वच्छता व आरोग्य विभागाचे सभापती क्रांतीसिंह माने पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

पालखी सोहळ्यादरम्यान शहरातील स्वच्छता आणि आरोग्य सेवा अखंडितपणे सुरू राहाव्यात, तसेच पावसाळ्यात सफाई कर्मचाऱ्यांना सुरक्षित वातावरणात काम करता यावे, या उद्देशाने नगर परिषदेकडून हा उपक्रम राबविण्यात आला. या सुरक्षा किटमुळे कर्मचाऱ्यांना पावसापासून तसेच स्वच्छता कामकाजादरम्यान होणाऱ्या संभाव्य संसर्गापासून संरक्षण मिळणार आहे.

यावेळी लालासाहेब अडगळे, आरोग्य विभाग प्रमुख मेहबूब शेख यांच्यासह नगर परिषदेचे अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!