Latest News

अकलूजात मराठा समाजाची महत्त्वपूर्ण बैठक ; मराठा आरक्षणासाठी पुन्हा आंदोलनाची हाक

महर्षि डिजीटल न्यूज | सागर खरात 

अकलूज : मराठा आरक्षण,कुणबी दाखले व इतर मराठा समाजाच्या मागण्यांसाठी समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या ३० मे पासून सुरू होणाऱ्या प्राणांतिक उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी माळशिरस तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर मराठा बांधव जाणार असून त्याच्या नियोजनासाठी दि.२३ मे रोजी सर्व पक्षीय मराठा बांधवांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

  सोमवारी येथे अखंड मराठा समाज माळशिरस तालुक्यातील कार्यकर्त्यांची बैठक झाली.त्यामध्ये समाजाच्या मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांनी अनेक वेळा आमरण उपोषण केले,त्यामुळे त्यांच्या प्रकृतीला धोका निर्माण झाला आहे.

त्यानंतर दोन वेळा राज्यातील  संपूर्ण मराठा समाज घेऊन मुंबईला गेले.मात्र आश्वासना पलीकडे हाती काही लागले नाही,अनेकदा मुदती देऊनही शासनाने केवळ फसवणूकच केल्याची मराठा समाजाची भावना झाली असल्याने शेवटी आर नाही तर पार ही भूमिका घेऊन मनोज जरांगे पाटील यांनी दि ३० मे रोजी त्यांच्या अंतरवाली सराटी या गावी पुन्हा आमरण उपोषणाचा इशारा दिला असून राज्यातील संपूर्ण मराठा समाज त्यांच्या पाठीशी आहे.

   त्यांच्या या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी माळशिरस तालुक्यातून ही हजारो मराठा बांधव जाणार असल्याने त्याचे नियोजन करण्यासाठी दि.२३ मे रोजी सायंकाळी ५ वाजता कृष्ण लीला बॅकवेट हॉल डॉ.धनेश गांधी हॉस्पिटल शेजारी याठिकाणी

 या सर्व पक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे,त्यामध्ये सर्व सत्ताधारी,विरोधी पक्षाचे नेते मंडळी ही उपस्थित राहणार असल्याचे सांगून जास्तीत जास्त मराठा बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!