Latest News

महाराष्ट्र बंदमध्ये अकलूजचाही सहभाग ! 23 जुलै रोजी अकलूज पूर्णपणे बंद राहणार?  वंचित बहुजन आघाडीची महाराष्ट्र बंदची घोषणा

महर्षि डिजीटल न्यूज | सागर खरात

अकलूज : वंचित बहुजन आघाडीने गुरुवार, दि. 23 जुलै 2026 रोजी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदमध्ये अकलूजचाही सहभाग राहणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. संघटनेच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, माळशिरस तालुका व अकलूज शहर शाखेच्या वतीने अकलूज बंद पाळण्यात येणार असून, नागरिक, व्यापारी, विद्यार्थी आणि विविध सामाजिक संघटनांनी या बंदला पाठिंबा द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

NEET परीक्षा पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीमाराचा निषेध व्यक्त करत हा बंद पुकारण्यात आला आहे. तसेच, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची किंवा पदमुक्तीची मागणी संघटनेने केली आहे.

वंचित बहुजन आघाडीच्या माळशिरस तालुका व अकलूज शहर शाखेने सर्व नागरिकांनी शांततेच्या मार्गाने बंद यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!